भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात आज घसरणीसह झाली.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली.
त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 60500 अंकांखाली तर निफ्टी (Nifty) 18000 अंकांखाली सुरू झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 394.52 अंकांच्या घसरणीसह 60,511 अंकांवर खुला झाला.
त्यानंतर खरेदीचा जोर दिसू लागला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 114.50 अंकांच्या घसरणीसह 17,968 अंकांवर खुला झाला.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 44 अंकांच्या घसरणीसह 60,862.21 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 15 अंकांच्या घसरणीसह 18,067.15 अंकांवर व्यवहार करत होता.
आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली