भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून असलेल्या तेजीला आज ब्रेक लागण्याचे संकेत आहेत
आज बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे
फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेवरही व्याज दर वाढवण्याचा दबाव राहण्याची शक्यता आहे.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 61,156.89 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18,177.90 अंकांवर खुला
सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 123 अंकांच्या घसरणीसह 60,997.56 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 29.85 अंकांच्या घसरणीसह 18,115.55 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 50 निर्देशांकात सन फार्मा, हिंदाल्को, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, आयटीसीच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसून येत आहे
भारती एअरटेल, आयशर मोटर्स, टायटन, मारुती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे