मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारत वाढलेल्या मौल्यवान धातूंच्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.
जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत झालेली वाढ, तसेच चीनमधील वाढता कोरोना संसर्ग यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे.
भारतात सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यात अडचण निर्माण होतेय.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 55,040 रूपयांवर आला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 69,510 रुपयांवर व्यवहार करत आहे.
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% वाढून $1,796.50 वर होते.
स्पॉट सिल्व्हर 0.6% वाढून $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% वाढून $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% वाढून $1,889.50 वर पोहोचले.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.