शेअर बाजारासाठी आजचा दिवस नकारात्मक ठरला असून (Closing Bell Share Market Updates) मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 635 अंकांची घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 186 अंकांची घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये आज 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,067 वर स्थिरावला.
निफ्टीमध्ये आज 1.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,199 वर पोहोचला
निफ्टी बँकमध्येही (Nifty Bank) आज तब्बल 741 अंकांची घसरण होऊन तो 42,617 वर पोहोचला.
आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल4.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आले.
बाजार बंद होताना मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात गेले.
आजच्या झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या एकूण भांडवल मुल्यामध्ये घट झाली आहे