मंगळवारी झालेल्या व्यवहारात पडझड झाल्यानंतर आज बुधवारी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली
एसजीएक्स निफ्टी निर्देशांक वधारला होता. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
अमेरिकन शेअर बाजारही तेजीसह बंद झाला होता.
आज सकाळी बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 291.42 अंकांच्या तेजीसह 61,993.71 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.85 अंकांच्या तेजीसह 18,435.15 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्सने 62 हजार अंकांचा टप्पाही ओलांडला होता
त्यानंतर विक्रीचा जोर वाढू लागल्याने पुन्हा घसरण दिसू आली.
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 67 अंकांनी वधारत 61,770.06 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 23.85 अंकांच्या तेजीसह 18,409.15 अंकांवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स, निफ्टीत तेजीसह सुरुवात