भारतीय शेअर बाजारातील व्यवहारात (Share Market) आजही अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे.
प्री-ओपनिंग सत्रात (Pre Opening Session), शेअर बाजारात तेजी दिसून आली.
बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजारात तेजी दिसून आली.
त्यानंतर पुन्हा एकदा विक्रीचा जोर वाढल्याने सेन्सेक्समध्ये (Sensex) घसरण दिसून आली
आशियाई शेअर बाजार (Asian Share Market) आणि एसजीक्स निफ्टीत (SGX Nifty) तेजी दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 189.93 अंकांच्या तेजीसह 61,257 अंकांवर खुला झाला
एनएसई निफ्टीचा निर्देशांक 89.70 अंकांच्या तेजीसह 18,288.80 खुला झाला
त्यानंतर विक्रीचा दबाव वाढू लागल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली
सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 109 अंकांच्या घसरणीसह 60,958.12 अंकावर व्यवहार होता
निफ्टी निर्देशांक 35 अंकांच्या घसरणीसह 18,163.80 अंकांवर व्यवहार करत होता.