आंतरराष्ट्रीय बाजारात फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयांनतर जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर काही अंशी वाढले आहेत. आज सोन्याचे दर 600 रूपयांनी तर, चांदीचे दर तब्बल एक हजार रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आज सोने खरेदीचा दिवस चांगला नाही असेच दिसून येते. सोन्याचे हे वाढलेले दर मुंबईसह, पुणे, नाशिक, कोलकत्ता मध्येही याच दराने व्यवहार करत आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,850 रूपयांवर आला आहे. आज एक किलो चांदीचा दर 69,030 रुपयांवर व्यवहार करत आहे. स्पॉट सिल्व्हर 0.6% वाढून $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% वाढून $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% वाढून $1,889.50 वर पोहोचले. स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% वाढून $1,796.50 वर होते. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.