एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील डॉलरच्या संख्येत झालेली वाढ यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळतेय.
भारतात लग्नसराईचादेखील सीझन सुरु आहे. अशातच सोन्याची वाढती किंमत ग्राहकांना न परवडणारी आहे.
आज बुलियन्सच्या रिपोर्टनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 55,880 रूपयांवर व्यवहार करत आहे.
तर, आज एक किलो चांदीचा दर 69,340 रूपयांवर व्यवहार करत आहे.
सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर मुंबईसह, पुणे, नाशिक, नागपूर, आणि कोलकाता दिल्लीसह अन्य शहरांमध्येही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करत असतात.
जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंची किंमत पाहता स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,886.70 प्रति औंस झाले.
US सोने फ्युचर्स 0.8% कमी होऊन $1,796.55 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.8% कमी होऊन $23.46 वर, प्लॅटिनम 0.5% कमी होऊन $1,006.88 वर आणि पॅलेडियम 0.3% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.