आज मार्च महिन्याचा पहिला दिवस... महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. आजही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत पेट्रोल 106.31 रुपयांनी, तर डिझेल 94.27 रुपयांनी विकलं जातंय. पुण्यात पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. औरंगाबादेत एक लिटर पेट्रोलची किंमत 108 रुपये, तर डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर आहे. परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरवर स्थिर. कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरवर स्थिर.