गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) दिवसेंदिवस वाढ होतेय. याचं कारण म्हणजे जेव्हापासून अमेरिकन मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून डॉलर मजबूत झाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,970 रुपये तर एक किलो चांदीचा दर 68,380 रूपये आहे. सोन्या-चांदीचे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, कोलकत्त्यासह राजधानी दिल्लीतही कमी अधिक प्रमाणात मागे पुढे होत असतात. तसेच, लग्नसराईचे दिवससुद्धा सुरु आहेत त्यामुळे सोन्याचे वाढलेले दर ग्राहकांना परवडत नाहीयेत. यासाठी काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.