भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय अस्थिर राहील्याचं दिसून आलं.
आज सकाळी बाजाराची सुरुवात तेजीने झाली, पण ती तेजी नंतर कायम राहू शकली नाही.
त्यामुळे बाजार बंद होताना प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अस्थिरता दिसून आली.
आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 37 अंकांच्या किंचित वाढीसह 60,978 अंकांवर बंद झाला
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14 अंकांच्या घसरणीसह 18,104 अंकांवर बंद झाला.
ऑटो, आयटी, एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांना तेजी दिसली.
तर बँकिंग, मेटल्स, एनर्जी या क्षेत्रांचे शेअर्स घसरले.
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही नफा वसुली दिसून आली आहे.
निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स तेजीत, तर 31 शेअर्स तोट्यासह बंद झाले.
तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 14 तोट्यासह बंद झाले.