आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळतेय.



आज क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये 2 टक्क्यांनी घट झालीये.



देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.



आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही घट, अथवा वाढ झालेली नाही.



देशात 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.



देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय



मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.



पुण्यातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय



नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं मिळतंय.



औरंगाबादेत पेट्रोल 108 रुपये, तर डिझेल 95.96 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.



कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर आहे.



परभणीत आज 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.