ग्राहकांना आज जर सोनं खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य नाही. कारण आजही सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.

जागतिक बाजरपेठेत डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि लग्नसराईचा काळ तसेच आर्थिक मंदीची भीती अशा अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर महागले आहेत.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,250 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,479 रुपये आहे.

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 420 रूपयांनी वाढ झालेली आहे.

आज एक किलो चांदीचा दर 68,420 रूपये आहे. चांदीचे दर काहीसे कमी झाले आहेत.

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात झालेली विक्रमी वाढ पाहून ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

तरी, लवकरच सोन्या-चांदीचे वाढलेले दर कमी होतील अशी आशा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.