मागच्या काही दिवसांत जागतिक बाजारातील डॉलरचे वाढलेले दर तसेच चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर झाला.

काल सोन्याचे दर 56 हजारांपर्यतं पोहोचले होते. एकूण आकडेवारी पाहता मागच्या पाच महिन्यांतील सोन्याच्या दराने सर्वात मोठी उच्चांक पातळी गाठली होती.

त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांनादेखील सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज सोन्याचे दर पाहता ग्राहकांना किंचित दिलासा मिळणार आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,570 रूपयांवर आला आहे.

आज एक किलो चांदीचा दर 68,660 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्या-चांदीचे हे दर मुंबई, पुण्यासह, नाशिक, नागपूर, दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी देखील काही अंंशी सारखेच आहेत.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.

स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.