लगीनसराईमुळे बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळतेय सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई हे यामागचं कारण आहे. नवीन वर्षात अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,764 रुपये आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,880 रुपये इतका आहे. सोन्याचे वाढलेले हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह अनेक शहरांत थोड्याफार प्रमाणात सारखेच व्यवहार करतात. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.