शेअर बाजारात आज चांगली सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार बंद होताना अस्थिरता पाहायली मिळाली. मात्र, आज मंगळवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स हळूहळू उसळी घेताना दिसत आहे. सेन्सेक्स सध्या 20.33 अंकानी तेजीत असून 60,113 वर पोहोचला आहे. तसेच, निफ्टी 27.65 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या तेजीत 17922 वर व्यवहार करत आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीने झाली. BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 49.11 अंकांच्या म्हणजेच 0.082 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 60,142 वर उघडला. तसेच NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी आज 27.95 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,922.80 वर उघडला. निफ्टीमध्ये मीडिया, मेटल, फार्मा, रिॲलटी, कंज्यूमर ड्यूरेबल्स, हेल्थकेयर इंडेक्समध्ये घसरणीचे चित्र दिसत आहे. आज बँक, ऑटो, ऑयल अँड गॅस, आयटी, एफएमसीजी, फायनेंशियल सर्विस या सेक्टरची घोडदौड सुरु आहे. आज शेअर बाजारात तेल आणि गॅस तसेच त्या संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. यामागे मोठे कारण म्हणजे आज सरकारने कच्चे तेल, डिझेल आणि विमान इंधनावरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याची घोषणा केली आहे.