नवीन वर्षात अनेक सणसमारंभ साजरे केले जाणार आहेत. नवीन वर्षात अनेकजण गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी सोन्याचं नाणं खरेदी केलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे. आज एक किलो चांदीचा दर 69,420 रुपयांवर व्यवहार करत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. स्पॉट सिल्व्हर 0.12% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.6% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.3% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत. स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.5% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.9% कमी होऊन $1,796.50 वर होते. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.