भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात. दररोज सकाळी 6 वाजता राज्य आणि शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीये. आज WTI क्रूड 1.66 डॉलर म्हणजेच, 2.13 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 73.39 डॉलरवर व्यापार करतंय. ब्रेंट क्रूड 1.89 डॉलर म्हणजेच, 2.24 टक्क्यांनी वाढून 79.94 डॉलरवर पोहोचलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही देशातील इंधनदर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे पुण्यात पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय