सोन्याचे दर वाढल्यामुळे ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागतोय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा दर सुरुवातीच्या व्यवहारात 0.14 टक्क्यांनी वाढला आहे.

बाजारात आज चांदी 0.68 टक्क्यांनी वाढली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,430 रूपयांवर व्यवहार करत आहे.

आज एक किलो चांदीचा दर 67,430 रूपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्या-चांदीचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह कोलकत्तामध्ये देखील वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत.आज सोन्याची स्पॉट किंमत 0.71 टक्क्यांनी वाढून $1,793.79 प्रति औंस झाली.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.