सोन्याच्या किमतीने 5 महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोन्यामध्ये 372 रुपयांची वाढ झाली आहे.

आजचा सोन्याचा दर 54,150 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सोन्याच्या वाढलेल्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एक किलो चांदीचा दर 67,020 रूपये आहे.

मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल 811 रुपयांची चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे.

स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

लग्नसराईच्या काळाज सोन्याच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे.

अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. तर, काहींनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.