जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला. यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले.

यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकन डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.

अशातच भारतात लग्नसराईचा काळ सुरु असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडत नाहीये.

सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

विशेष बाब म्हणजे, सोन्यापेक्षा चांदीचे दर दुप्पटीने वाढले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 67,910 रूपये आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,260 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 49,738 रूपयांवर व्यवहार करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत. शुक्रवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.71 टक्क्यांनी वाढून $1,793.79 प्रति औंस झाली.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.