आल्याचा (Ginger) वापर खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो. पुष्कळ लोक सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा मजबूत चहा पितात, तर काहीजण आलं पाण्याबरोबरही खातात. आल्याचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत.



आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अनेक खनिजे आढळतात. ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होते आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, तर मग जाणून घेऊयात आल्याच्या फायद्यांविषयी...



जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर आल्याचे पाणी त्यासाठी रामबाण उपाय आहे.



आल्यामध्ये मॅंगनीज, सॉर्बिटॉल, आयसोटोन, फोलेट इत्यादी असतात. ज्यामुळे तुमच्या बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.



आले हे हृदयासाठीही खूप चांगले मानले जाते कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म देखील आहेत.



परंतु, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.



आल्याचे पाणी हाडांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते. यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम सारखे घटक असतात.



जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात.