या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. रुही कारखानीस असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेत्री गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या संदर्भात बोलताना गायत्री म्हणाली, रुही कारखानीस ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. मालिकेतली माझी भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मी एक रिऍलिटी शो केला होता. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत असल्याची भावना गायत्रीने व्यक्त केली. गायत्री दातार साकारत असलेल्या रुही कारखानीसच्या भूमिकेमुळे मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.