बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे देशभरात आणि सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. शाहरूखचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या 2 नोव्हेंबर रोजी शाहरूखचा वाढदिवस आहे. शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. शाहरूखच्या वाढदिवसाआधीच त्याच्या मुंबईतील मन्नत या निवास्थानाबाहेर मोठ्या संख्येने चाहते जमू लागले आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रविवारी मन्नतच्या बाहेर मोठ्या संख्येने चाहते दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चाहते त्यांच्या आवडत्या किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. शाहरूखने देखील चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. दोन्ही हात जोडून शाहरूखने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 2 नोव्हेंबर रोजी शाहरूख खान वयाची 56 वर्षे पूर्ण करत आहे.