बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. पण ती गरोदरपणातही खूप काम करत आहे. आता गौहरच्या लेटेस्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. गौहर खानने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये गौहर खान काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत नाही. अभिनेत्रीने तिच्या स्टायलिश लूकने तिचा बेबी बंप लपवला आहे.