'बिग बॉस' फेम अभिनेता शालिन भानोत आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे. शालिनच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे. दुखापत झाल्यानंतरदेखील शालिनने शूटिंग मात्र सुरुच ठेवलं आहे. 'बेकाबू' या मालिकेबद्दल बोलताना शालिन म्हणाला,बेकाबू' या मालिकेच्या सेटवर मी पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो. एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना शालिनच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. अभिनेत्याने जखमी अवस्थेत शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे. शालिन जखमी झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत. शालिन भानोत नुकताच सलमान खानच्या'बिग बॉस'मध्ये दिसला होता. शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे.