बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. कार्तिकने आजवर अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. कार्तिकने नुकतचं एका कार्यक्रमात लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. कार्तिक आर्यन बोहल्यावर चढणार असल्याने त्याचे चाहते आनंदी आहेत. कार्तिक आर्यन म्हणाला,लग्नाचे लाडू खावेत असं मलाही वाटतंय. कार्तिक आर्यन पुढे म्हणाला,आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला सांगू इच्छितो की, मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कार्तिक आर्यनने लग्न करणार असल्याची घोषणा केल्यानंतर तो कोणासोबत लग्न करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत कार्तिक आर्यनचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता कार्तिकचे 'सत्यप्रेम की कथा', 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.