बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने वयाच्या 17 व्या वर्षी कोणाच्याही मदतीशिवाय सहाय्यक दिग्दर्शक झाला.



दिग्दर्शक असो, अभिनेता, निर्माता किंवा पटकथा लेखक फरहानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.



बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईत झाला.



फरहान अख्तरने 1991 मध्ये 'लम्हे' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.



'दिल चाहता है' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाने फरहानला एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि हाच त्याच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला.



फरहानने 2008 मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फरहानला 'रॉक ऑन' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.



फरहानने 2011 मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनयही केला होता.



फरहान 2002 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' आणि 2005 मध्ये 'नच बलिए' या टेलिव्हिजन शोमध्ये जज म्हणून देखील दिसला.