मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली आहे. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये नेहाने सहा गोंडस मुलांची आई असल्याचं कबुल केलं आहे. नेहाने सहा कुत्र्याची पिल्लं दत्तक घेतली आहेत. नेहाने पती शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. 'बिग बॉस 12'ची स्पर्धक असलेल्या नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिल्या कामाचं नेहाला 500 रुपये मानधन मिळालं होतं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.