लसणाच्या वापराने जेवणाची चव वाढतेच पण त्यासोबतच लसणाचा अनेक रोगांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर केला जातो.



लसूण केस, त्वचा यांच्यासह अनेक रोगांवरही उपायोगी आहे. लसणाचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो.



लसणामध्ये अॅलिसिन नावाचं एक संयुग आढळतं, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलवर प्रभावी आहे.



आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लसणामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.



बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. या आजारांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा समावेश आहे.



तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी लसूण हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय आहे.



दररोज सकाळी उठल्यावर कच्च्या लसूण आणि कच्ची लवंग चघळल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.



लसणात असलेले अँटीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं.



यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अनेक प्रकारचे आजार आणि संक्रमणांपासून आपलं संरक्षण करतात.




यामुळे हृदय निरोगी राहते आणि अनेक आजार दूर होतात.