मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक तत्वे आढळतात.



रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासावर फायदा होऊ शकतो.



रिकाम्या पोटी मनुक्याचे सेवन केले तर हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.



रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्यास रक्ताची कमतरतेपासून म्हणजेच अॅनिमियापासूनही आराम मिळतो.



तुम्हाला पचनसंस्थेच्या त्रास असेल तर नियमितपणे मनुके खाणे फायदेशीर ठरू शकते.



मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आदी समस्या दूर होतात.



त्वचा संबंधित आजाराच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते.



मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे मनुक्याचे सेवनाने त्वचा संबंधित आजारातून दिलासा मिळतो.



रिकाम्या पोटी मनुक्याच्या पाण्याचे सेवन केल्याने केसगळतीची समस्या तर दूर होईल.



वरील उपाय अंमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.