दोन वर्षाआधी जगासह देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळाला. प्रत्येक घरात कोरोनाचे रुग्ण दिसत होते.



कोरोना आणि त्याच्या सबव्हेरियंट हजारो लोकांचे प्राण गेले. डेल्टा व्हेरियंटचा कहर पाहायला मिळाला. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. त्यामुळे अनेकजण एकटे राहायला शिकले.



त्याचा दुष्परिणाम असा झाला की, काही लोक मानसिक आजारांच्या विळख्यात सापडले. पण कोरोना विषाणू संदर्भातील आणखी एक धोकादायक बाब समोर आली आहे.



कोरोना विषाणूचा लहान मुलांवर खूप वाईट परिणाम दिसत आहे. या विषाणूमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे.



संशोधकांनी गर्भवती महिला आणि तिच्या गर्भाच्या आरोग्यावर कोविड 19 विषाणूचा होणारा परिणाम याबाबत अभ्यास केला.



ज्या अभ्यासामध्ये मुलाच्या न्यूरोडेव्हलपमेंटल स्थितीचा अभ्यास करण्यात आला.



या संशोधनात आढळलं की, कोरोना काळात जन्मलेल्या बाळामध्ये मज्जासंस्थेचा विकास संथपणे झाला.



यामुळे कोविड काळात जन्मलेल्या बाळांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल डिस ऑर्डर, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, बौद्धिक अपंगत्व आणि एकाग्रतेचा अभाव अशा समस्या आढळून आल्या.



या संदर्भात जामा नेटवर्क ओपनमध्ये अभ्यासाचा एक अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये कोविड 19 दरम्यान मुलांमध्ये झालेले बदल समोर आले आहेत.