हाथ स्वच्छ न धुणे हे बॅक्टेरियल इन्फेक्शनचं एक प्रमुख कारण आहे.
टायफॉईड हा एक विषाणूजन्य आजार असून याची लक्षणं एक ते तीन आठवड्यानंतर दिसतात.
सध्या कोरोनासोबतच जिवाणूजन्य आजार ( Bacterial Infection ) वाढताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे लोकांना फ्लू, सर्दी किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असे आजार होत आहेत.
कोरोना महामारीमुळे लोकांनी बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून बचाव होण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. त्यामधील एक चांगली सवय म्हणजे हात धुणे.
पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळतोय, त्यामुळे लोक पुन्हा या सवयींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
टायफॉइड हा एक जिवाणूजन्य आजार आहे. दूषित अन्न आणि दूषित पाणी प्यायल्यामुळे टायफॉइड पसरण्याचा धोका जास्त असतो.
बाहेरून आल्यावर, काही खाण्यापिण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी हात नीट स्वच्छ धुतले पाहिजेत.
जिवाणू हाताद्वारे तोंडापर्यंत आणि तोंडातून शरीरापर्यंत पोहोचतात आणि विषाणूजन्य आजारांची लागण होते.