पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या 'बाप्पा'ला निरोप देण्यात येत आहे



दहा दिवस दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला जातोय.



मुंबईसह राज्यभरात बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला आहे.



ढोलताशांचा गजर. त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त. गुलालांची उधळण. बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी.



मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे.



बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय.



तर लालबागचा राजाची मिरवणूक गिरगावच्या दिशेनं मार्गस्थ झालाय.



अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलीय.



मुंबईत गिरगाव, जुहू चौपाटी या प्रमुख विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.



गिरगावात उसळला भाविकांचा जनसागर!