देशाचे गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत.



अमित शाह यांनी आज लालबागचा राजाचे दर्शन घेतलं.



तसेच, काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठीही ते उपस्थिती लावणार आहेत



तसेच शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती मिळत आहे.



अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचं राजकीय महत्व काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.



पुढच्या चार महिन्यात मुंबई महापालिकांचं बिगुल वाजणार आहे.



राज्यातलं ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपनं थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केलं आहे.



मुंबई पालिकेचं वर्षाचं बजेट 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.



गेली 25 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आहे



भाजपचं मुंबई पालिकेवर लक्ष केंद्रीत



गेल्या महापालिका निवडणुकीत आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजपनं 31 वरुन थेट 82 जागा जिंकल्या होत्या



उत्तर भारतीय मतं, गुजराती मतं आणि मनसेच्या जवळीकीमुळे मराठी मतांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे