मुंबईत पारसी कुटुंबात सायरस मिस्त्री यांचा जन्म झाला. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते.



त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.



सायसर मिस्त्री हे 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले.



वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं.



सायसर मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.



शापूरजी पालनजी उद्योग समूहाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे.



त्यांनी टाटा समूहातील 18.5 टक्के हिस्सा खरेदी केला होता.



याशिवाय 66 टक्के हिस्सा टाटा समूहाच्या विविध ट्रस्टकडे आहे. सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.



पालोनजी ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.



सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सहावे चेअरमन होते.



मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यात त्यांनी टाटा समूहात भागीदारी केली आहे.