आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा (Ganpati Bappa) भक्तांचा निरोप घेतो आहे.

मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन (Ganesh Visarjan) होईल.

लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे.

दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकाही सज्ज आहे. विसर्जनासाठी BMCकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाची ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष आहेत

प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीव रक्षक तैनात आहेत तर नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफा व्यवस्था.

सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष. अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश.