लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असून वाजत-गाजत राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.!



गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल



राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल



साश्रू नयनांनी गणेशभक्त बाप्पाचं विसर्जन करतील. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होईल



लालबाग, परळ सारख्या मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळेल



मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळेल.



दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे



मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत



लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल



राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे