गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातल्यानंतर गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, 'देखो चाँद नेटफ्लिक्स पे आ रहा है. गंगूबाई काठियावाडी 26 एप्रिल रोजी होणार प्रदर्शित.' ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नसेल पाहिला ते प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.