वाढत असलेल्या महागाईच्या झळा आता तीव्र होणार आहे.
येत्या एक मे पासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे.
सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
कच्च्या मालाच्या दरासह इंधन दरातही वाढ झाली आहे. दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.
असोसिएशनचे 52000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत.