आलिया भटचा बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी शुक्रवारी प्रदर्शित झाला. रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं 63 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर दहा कोटी कमाई केली होती. शनिवारी (26 फेब्रुवारी) या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 13.32 कोटी होते. रविवारी 15 कोटी, सोमवारी 8.19 कोटी आणि मंगळवारी 10.01 कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटानं केलं. बुधवारी या चित्रपटानं 6.25 कोटींची कमाई केली. आता देशातील काही राज्यांमध्ये चित्रपटगृह ही 100 टक्के क्षमतेनं सुरू होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.