आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोरोना महामारीनंतर दमदार कमाई करणारा हा चौथा सिनेमा आहे. या सिनेमाने गेल्या 14 दिवसांत 100 कोटींची कमाई केली आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. अनेक बिग बजेट सिनेमांना 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा टक्कर देत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई'वर आधारित आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.