भारतातील (India) दहा महिला फीट@फिफ्टी या खास मोहिमेला निघाल्या आहेत.
या महिला गिर्यारोहक तब्बल 4 हजार 977 किलोमीटरच्या हिमालयीन ट्रेकवर चालल्या आहे
12 मार्चला अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून सुरू होणारी ही मोहीम पाच महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात काश्मीर मधील टायगर हिलला संपणार आहे
हिमालयातील अत्यंत खडतर दऱ्या खोऱ्यातून तब्बल 4 हजार 977 किमीची पायी ट्रेकिंग करणार आहे.
या दहा रणरागिणींमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बिमला नेगी देऊस्कर या सुद्धा आहेत.
पद्मभूषण आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात या महिला 12 मार्च पासून अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून मोहिमेला सुरुवात करणार आहे.
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या हिमालयातील 39 खिंडी या महिला ट्रेकिंग करत पार करणार आहे.