पोलीस म्हणजे, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती.

लहानपणापासूनच आपण पोलीस हा शब्द ऐकतो, पोलिसांना पाहतो.

पण तुम्हाला पोलीस या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?

'Police' हा शॉर्ट फॉर्म आहे, पोलीस शब्दाचा फुल फॉर्मही आहे.

देशातील प्रत्येक राज्यात गुन्हेगारांना धूळ चारणं, कायदा-सुव्यवस्था राखण्याचं अत्यंत जबाबदारीचं काम पोलीस करतात.

पोलीस विविध मार्गांनी नागरिकांचं गुन्हेगारांपासून संरक्षण करतात.

पोलीस हे असं एक सुरक्षा दल आहे, जे आपल्या देशातील रहिवाशांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात.

जसं देशांच्या सीमांवर तैनात असलेले जवान परकीय शत्रूंपासून आपलं संरक्षण करण्यासाठी सज्ज असतात.

पोलीस अधिकार्‍यांच्या गणवेशावर लावण्यात आलेले स्टार्स पोलीस खात्यात संबंधित अधिकारी कोणत्या विशिष्ट पदावर आहेत हे दर्शवतात.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस विभागातील सर्व कर्मचारी सदैव कार्यरत असतात.

देशाच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचे अधिकार पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत.

देशाची कायदा-सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम आहे.

भारत पोलीस दलाची सुरुवात इंग्रजांनी केली होती.

POLICE शब्दाचा फुल फॉर्म, 'Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies' आहे.

फक्त कोलकाता वगळलं तर, सर्व भारतातील सर्व राज्यांतील पोलीस 'खाकी' वर्दी (गणवेश) परिधान करतात.