दिनेश रामदीननं 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं वेस्ट इंडीजकडून खेळताना 74 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यातील 110 डावात त्यानं 25.00 च्या सरासरीनं आणि 80.35 स्टाईक रेटनं 2 हजार 220 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश होता. तर, कसोटी क्रिकेटमध्ये 25.87 सरासरीनं आणि 48.74 च्या स्ट्राईक रेटनं 2 हजार 898 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 636 धावांची नोंद आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आलंय. वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीननं आज (18 जुलै 2022) आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय.