देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे



देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे



देशात मागील चार दिवस दररोज वीस हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली, पण आज कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे



रविवारी दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशात सध्या 1 लाख 44 हजार 264 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत



गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



देशात एकूण 4 कोटी 30 लाख 97 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे



देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत