कोकणातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडतो. याच आंबोली जवळ असलेलं गेळे गावात कावळेसाद पॉईंट येथे उलट्या दिशेने वाहणारा धबधबा आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कावळेसादच्या पठारावरून वाहणार पाणी दरीत कोसळतं. पाणी जेव्हा या दरीत कोसळत तेव्हा हे पाणी दरीत खाली न जात वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने जातं. मुळात कावळेसाद पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान तर दुसऱ्या बाजूला दीड ते दोन हजार फूट खोल दरी आहे. याठिकाणी धुक्याचा लपंडाव पहायला मिळतो. पावसाळ्यात दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते . पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहण्यासाठी येतात. राज्यभरातून पर्यटक आंबोलीत पर्यटनाचा आस्वाद घ्यायला येत असतात. राज्यभरातून पर्यटक आंबोलीत पर्यटनाचा आस्वाद घ्यायला येत असतात.