शिर्डीतील साई मंदिरात पार पडलेल्या गुरुपौर्णिम उत्सावात साईचरणी कोट्यवधीचं दान प्राप्त झालं. उत्सवाच्या तीन दिवसा साई भक्तांनी पाच कोटी 12 लाख रुपयांचं भरभरुन दान दिलं. या उत्सवात तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. भाविकांनी दिलेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली. त्यानुसार गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी एकूण 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झालं. दानपेटी - 2 कोटी 17 लाख, देणगी काऊंटर - 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन डोनेशन - 1 कोटी 36 लाख रुपये जमा झाले. तर 12 देशांचे 19 लाखांचे परकीय चलन, 22 लाख 14 हजारांचे आणि 3 लाख 22 हजार रुपये किमतीची चांदी अर्पण करण्यात आली. शिर्डीतील साई मंदिरात 12 ते 14 या काळात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणाऱ्यात आला. यंदा भाविकांनी भर पावसातही मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.