पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली त्यांनी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इमरान खान यांना इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने मंगळवारी त्यांना अटक केली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे नेते मुसर्र्त चीमा यांनी ट्वीट करत अटक करणारे सुरक्षा अधिकारी यांनी इमरान खान यांना टॉर्चर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे सुरक्षा अधिकारी यांनी इमरान खान यांना टॉर्चर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पीटीआयने जो व्हिडीओ ट्विट केला आहे की, त्यात इमरान खान यांचे वकील जखमी दिसत आहे. इमरान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अटक करताना कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. कोर्टात दाखल होण्याअगोदरच इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे.