अंतराळात अनेक लघुग्रह फिरतात, कधी-कधी हे पृथ्वीच्या जवळून जातात. असाच एक असा लघुग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती नासाने दिली आहे. तसेच हा लघुग्रह लवकरच पृथ्वीच्या जवळ येईल अशी भिती देखील नासाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पृथ्वीजवळून 2023 HZ4 हा लघुग्रह 1.19 मिलिअन किमी इतक्या जवळ येईल. pixabay.com हा लघुग्रह ताशी 81 हजार 907 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. सध्याच्या प्रक्षेपणानुसार, हा मोठा खडक ग्रहाजवळून जाईल आणि कोणतीही हानी होणार नाही. या लघुग्रहाचा शोध नुकताच लागला असल्याचं देखील नासानं सांगितलं आहे. परंतु विशेष म्हणजे विशेष म्हणजे पृथ्वीच्या जवळ येणारा हा एकमेव लघुग्रह नाही. आणखी दोन लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचं नासानं सांगितलं आहे. तसेच, यापैकी एकही लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे नासाने म्हटले आहे.